Loksabha 2019 : 'अच्छे दिन'चे घ्या गाजर...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

भाजपने 2014च्या निवडणूकीदरम्यान 'अच्छे दिन' या मुद्द्यावरून प्रचार केला होता. भाजप सत्तेत आल्यानंतर विरोधकांनी 'अच्छे दिन' या शब्दावरून टीका केली. 'अच्छे दिन तो दिखे नही, बुरा दिन हर रोज आया... एप्रिल फूल बनाया' असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

पुणेः लोकसभा निवडणूकीच्या प्रचारांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. इंटरनेटच्या युगात प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठा वापर केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर टीका करताना ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे.

भाजपने 2014च्या निवडणूकीदरम्यान 'अच्छे दिन' या मुद्द्यावरून प्रचार केला होता. भाजप सत्तेत आल्यानंतर विरोधकांनी 'अच्छे दिन' या शब्दावरून टीका केली. राष्ट्रवादीने 'This time don't forget to vote against 'BURE DIN'.. ' या शीर्षकाखाली एक इमेज शेअर केली आहे. इमेजमध्ये एक गाजर दाखवण्यात आले आहे. शिवाय, 'अच्छे दिन तो दिखे नही, बुरा दिन हर रोज आया... एप्रिल फूल बनाया' असे म्हटले आहे.

राष्ट्रवादीने हे छायाचित्र भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी व पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे. नेटिझन्स या ट्विटवर रिऍक्ट होत असून, हे छायाचित्र व्हायरल होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीने आज एप्रिल फूल डे साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'हॅपी फेकू डे' म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: ncp tweets acche din cartoon against narendra modi Loksabha 2019