Loksabha 2019 ः राजीव गांधी हेच राहुल यांचे वडील याचा पुरावा काय?: भाजप नेता

bjp leader Vinay Katiyar
bjp leader Vinay Katiyar

बस्ती (उत्तर प्रदेश): लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते विनय कटियार यांनी राजीव गांधी हेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे वडील याचा पुरावा काय? असे विचारल्याने काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कटियार यांनी विजय शंखनाद सभेत काँग्रेसचा समाचार घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आमचे 45 जवान हुतात्मा झाले आणि आज काँग्रेस याचे पुरावे मागत आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीचा पुरावा मागत आहात? मी, एक विचारतो की, जेव्हा बाळ जन्माला येते, तेव्हा तोच त्या मुलाचा बाप आहे, याची खात्री आईच देते. राहुल गांधी यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सोनिया गांधी यांनी सांगितले असेल की राजीव गांधी तुझे वडील आहेत. जर याचा पुरावा मागितला तर तुम्ही सांगू शकाल का?'

'काँग्रेस पक्ष केवळ एकच करते. आपल्या गर्भातून ते दहशतवादाला जन्म देतात. लष्कराचे जवान कोणाचेही सरकार येईल तेव्हा बुलेटप्रुफ जॅकेट मागतात. त्याकडे कोणी लक्ष देत नाही. पंतप्रधान मोदींनी एक लाख बुलेटप्रुफ जॅकेट मागीतले आहेत. किमान सीमेवर लढताना सैनिकांना सुरक्षा कवच तर मिळाले. जी-जी चांगली कामे झाली ती सर्व भाजपने केली आहेत,' असेही कटियार म्हणाले.

कटियार पुढे म्हणाले, 'ज्यांच्या खिशात पाच रूपये नव्हते. त्यांना उपचारासाठी पाच लाख रूपये देण्याचे काम मोदींनी केले आहे. देशात दहशतवाद पसरवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. अफजल गुरूसारख्या अनेक जणांनी देशात जन्म घेतला. ही सर्व काँग्रेसचे काम आहे. आज राहुल गांधीही तीच परंपरा चालवत आहेत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com