Loksabha 2019 : राहुल गांधी अजून 'बच्चा' आहे: ममता बॅनर्जीं

rahul gandhi is just a kid says Mamata Banerjee
rahul gandhi is just a kid says Mamata Banerjee

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीबद्दल काय बोलणार? ते अजून 'बच्चा' (लहान मूल) आहेत, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी 23 मार्च रोजी मालदा येथे बोलताना ममता बॅनर्जी व नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, 'भाजप आणि तृणमूल दोन्ही पक्ष आपापली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या काळात पश्चिम बंगालचा कोणताही विकास झालेला नाही. ममता बॅनर्जी यांचा कारभारही नरेंद्र मोदी यांच्यासारखाच आहे. केवळ एक व्यक्ती पश्चिम बंगाल चालवते असे म्हटले होते. हे दोन्ही नेते कोणाचाही सल्ला ऐकत नाहीत.'

राहुल गांधींना टोला लगावताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'राहुल गांधी यांनी स्वत:चे मत मांडले. मला त्याविषयी काहीही बोलायचे नाही.  ते अजून बच्चा (लहान मूल) आहेत. मी त्याबद्दल काय बोलणार?' दरम्यान, ममता आणि राहुल यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे आता महाआघाडीचे काय होणार, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. महाआघाडीत सर्व विरोधी पक्षांना सामील करुन घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. पण ममता बॅनर्जी हे राहुल यांचे नेतृत्व स्वीकारणार नसल्याचा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com