धक्कादायक! राहुल गांधी पिछाडीवर; गांधी घराण्याचा किल्ला ढासळणार? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मे 2019

गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना इराणी यांनी पहिल्या फेरीत पिछाडीवर टाकले आहे. कॉंग्रेससाठी हा जोरदार धक्का आहे. 

लोकसभा निकाल 2019 : अमेठी : गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना इराणी यांनी पहिल्या फेरीत पिछाडीवर टाकले आहे. कॉंग्रेससाठी हा जोरदार धक्का आहे. 

गेल्या निवडणुकीमध्ये इराणी यांनी राहुल गांधी यांना जोरदार लढत दिली होती. यावेळीही राहुल यांना विजयासाठी झगडावे लागेल, अशी चिन्हे होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत तरी हे चित्र असेच दिसले आहे. 

यंदा राहुल गांधी यांनी केरळमधूनही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राहुल गांधी तब्बल सहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत. 

ताज्या बातम्या आणि विश्‍वासार्ह निकालांसाठी डाऊनलोड करा 'सकाळ'चे ऍप
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi trailing in Amethi Lok sabha constituency Smriti Irani leads