Loksabha 2019 : लालूंच्या विरहात राबडी देवींनी केली कविता

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

लालू प्रसाद यादव यांच्या विरहातून पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी एका कविता रचली असून, ती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

पाटणा : पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या विरहात त्यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी कविता केली आहे. सोशल मीडियावर ती व्हायरल झाली आहे.

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बिहारचा मुख्य विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद) दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एकेकाळी बिहारच्या राजकारणाचे केंद्र असलेले आरजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव कारागृहात आहेत. मोठा मुलगा तेजप्रतापने बंडाचे निशाण फडकावले आहे. या सगळ्यामुळे निराश झालेल्या लालू प्रसाद यादव यांच्या विरहातून पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी एका कविता रचली असून, ती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

राबडी देवीने आपल्या कवितेत अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्या लिहितात :

'नैना थोड़े हैं नम
दिल में है ज़रा सा गम
पर हिम्मत न टूटी
न हुआ है हौसला कम

बड़बोले पापी को
लाएंगे जमीन पर हम
इस साज़िश का बदला
बदलाव से लेंगे हम

कोई कैसे करेगा जुदा
कोई कैसे करेगा जुदा
जीवन में लालू हैं
जन जन में लालू हैं
कण कण में लालू हैं
हर मन में लालू हैं

दरम्यान, 900 कोटींहून जास्त रुपयांच्या चारा घोटाळा प्रकरणी तीन प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे. रांचीच्या बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात ते शिक्षा भोगत आहेत. ज्यावेळी हा कथित घोटाळा झाला, त्यावेळी राजद पक्ष सत्तेत होता आणि लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते.

Web Title: Rjd Rabri Devi writes a poem for Lalu Prasad Yadav