Loksabha 2019 : पाकला दिला होता गंभीर इशारा : नरेंद्र मोदी

Loksabha 2019 : पाकला दिला होता गंभीर इशारा : नरेंद्र मोदी

पाटण (गुजरात) (पीटीआय) : भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान हे सुखरूप मायदेशी परतले नाहीत, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पाकिस्तानला दिला होता, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील प्रचारसभेत बोलताना केला. 

गुजरातमधील पाटण येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले, की देशाच्या सुरक्षेला आपल्या सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले. पंतप्रधानपदाची खुर्ची राहो अथवा जावो, पण दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा निश्‍चय मी केला होता. 

बालाकोटवरील कारवाईवेळी भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन हे शेजारी देशाच्या तावडीत सापडले होते. मात्र अभिनंदन यांना मायदेशी पाठवले नाही तर गंभीर परिणाम होतील, असा इशारा पत्रकार परिषद घेऊन सरकारने दिला होता. "मोदींनी 12 क्षेपणास्त्रे तयार ठेवली असून, कदाचित पाकिस्तानवर हल्ला केला जाईल आणि त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते,' असा दावा त्या वेळी अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केले होता. मात्र पाकिस्तानने अभिनंदन यांना मुक्त केले, अन्यथा ती "कत्तल की रात' ठरली असती. हे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने म्हटले होते, मला याबाबत काहीही म्हणायचे नाही. योग्य वेळी मी याबाबत बोलेन, असे मोदी म्हणाले. 

गुजरातमधून लोकसभेच्या 26 जागांवर भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही मोदी यांनी या वेळी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही मोदींनी टीका केली. पुलवामातील हल्ल्यानंतर त्यास प्रत्युत्तर देण्यात यावे, अशी देशातील जनतेची इच्छा होती. त्यानुसार कारवाईचे आदेश मी दिले. मी असे केले नसते तर देशाने मला माफ केले असते का, असा प्रश्‍नही मोदी यांनी या वेळी केला. 

पंतप्रधानपदाची खुर्ची जाईल किंवा राहील, एक तर मी जीवंत असेल किंवा दहशतवादी जीवंत राहतील, असा निश्‍चय मी केला होता. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com