Loksabha 2019 : सनी देओल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Sunny Deol has filed nomination from Gurdaspur Lok Sabha constituency
Sunny Deol has filed nomination from Gurdaspur Lok Sabha constituency

लोकसभा 2019
चंदीगड : देशातील लोकसभा निवडणुकीत आपले नशीब अजमाविण्यासाठी रिंगणात उतरलेले अभिनेता आणि भाजपचे उमेदवार सनी देओल यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

त्यांच्यासह भाऊ बॉबी देओलही होते. सुवर्ण मंदिरात येताना सनी देओल (वय 62) यांनी गडद निळ्या रंगातील पगडी आणि निळ्या रंगातील शर्ट घातला होता. दर्शनानंतर ते गुरदासपूरला रवाना झाले. तेथे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नंतर तेथील पीडीए मैदानात त्यांची सभा झाली. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर सनी देओल मतदानासाठी मुंबईला गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com