बास! रजनीकांतनेच मोदींना आशीर्वाद दिला.. आता विषयच संपला! 

गुरुवार, 23 मे 2019

ज्याच्यासाठी जगात काहीही अशक्‍य नाही, अशा वदंता आहेत त्या सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभाशिर्वाद दिले. मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपप्रणित एनडीएने 342 जागांवर आघाडी मिळविली आहे. एकट्या भाजपने जवळपास तीनशे जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा भाजप स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करणार आहे. 

लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : ज्याच्यासाठी जगात काहीही अशक्‍य नाही, अशा वदंता आहेत त्या सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभाशिर्वाद दिले. मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपप्रणित एनडीएने 342 जागांवर आघाडी मिळविली आहे. एकट्या भाजपने जवळपास तीनशे जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा भाजप स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करणार आहे. 

मोदी आणि रजनीकांत यांच्यात मैत्री आहे. यापूर्वीही अनेकदा ही मैत्री जाहीररित्या दिसली आहे. मोदींना मिळालेल्या घवघवीत यशानंतर रजनीकांत यांनी ट्‌विट करून त्यांचे अभिनंदन केले. 

रजनीकांत यांच्याशिवाय ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही मोदी यांचे अभिनंदन केले.

मोदी यांचे राजकीय गुरु आणि भाजपच्या मार्गदर्शक मंडळातील सदस्य लालकृष्ण अडवानी यांनीही त्यांचे अभिनंदन केले. 'भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिल्याबद्दल मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांचे हार्दिक अभिनंदन! पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने हा विजय साकारला आहे', असे अडवानी म्हणाले. 

 

ताज्या बातम्या आणि विश्‍वासार्ह निकालांसाठी डाऊनलोड करा 'सकाळ'चे ऍप 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superstar Rajinikath congratulates PM Narendra Modi for grand victory in Lok Sabha 2019