Loksabha 2019: मोदींच्या विरोधातील तेजबहाद्दूर यांची उमेदवारी रद्द 

वृत्तसंस्था
Wednesday, 1 May 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे राहिलेले बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात आली. यामुळे सप-बसपच्या गोटातही खळबळ उडाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना लष्कराकडून प्रमाणपत्र देण्याची नोटीस बजावली होती. यावर तेज बहादूर यांनी दोन्ही नोटिसांना उत्तरे दिली, मात्र उमेदवारी दाखल केल्यापासून घाबरलेल्या पंतप्रधान मोदी यांनी अडचणी निर्माण केल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केला. 

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे राहिलेले बडतर्फ जवान तेज बहाद्दूर यांची उमेदवारीच नाट्यमय घडामोडीनंतर रद्द करण्यात आली. यामुळे सप-बसपच्या गोटातही खळबळ उडाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना लष्कराकडून प्रमाणपत्र देण्याची नोटीस बजावली होती. यावर तेज बहादूर यांनी दोन्ही नोटिसांना उत्तरे दिली, मात्र उमेदवारी दाखल केल्यापासून घाबरलेल्या पंतप्रधान मोदी यांनी अडचणी निर्माण केल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केला. 

निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी तेजबहाद्दूर यांना नोटीस देत संरक्षण मंत्रालयाकडून प्रमाणपत्र आणण्यास सांगितले होते. यासाठी बुधवारी दुपारी 11 वाजेपर्यंतची वेळ दिली होती. त्यांना दोन नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. आज सकाळी 11 वाजता तेज बहाद्दूर यादव त्यांच्या वकिलांसोबत निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते, मात्र अजूनही यावर कुठलाही तोडगा निघाला नसून तेजबहाद्दूर यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी सप-बसप आघाडीने मोठी खेळी खेळली. सप-बसप महाआघाडीने वाराणसी येथील आपला उमेदवार बदलताना बीएसएफ जवान तेज बहादूर यांना उमेदवारी जाहीर केली. तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tej Bahadur Yadavs nomination cancelled by the Election Commission