Loksabha 2019: 'बिहारमध्ये भाजपआघाडी 31 जागा जिंकेल'

Loksabha 2019: 'बिहारमध्ये भाजपआघाडी 31 जागा जिंकेल'

पाटणा: बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी आज राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. लालूप्रसाद हे यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसले असते, तर अधिक चांगले झाले असते; कारण ते जंगलराजचे प्रतीक आहेत. या निवडणुकीमध्ये भाजप आणि मित्र पक्षांच्या आघाडीला 31 जागा मिळतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

बिहारमध्ये यंदा प्रथमच मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा राष्ट्रीय जनता दल, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष भाजपसोबत एकत्रितपणे लढत आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा चेहरा हा नितीशकुमार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com