Election Results : रत्नागिरीत शिवसेना आघाडीवर; कार्यकर्त्यांत उत्साह

Election Results : रत्नागिरीत शिवसेना आघाडीवर; कार्यकर्त्यांत उत्साह

रत्नागिरी - रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात सातव्या फेरीत शिवसेनेचे विनायक राऊत यांनी आघाडी घेतल्यानंतर शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे तर स्वाभिमानसह काँग्रेसच्या गोटात शांततेचं वातावरण होत.

शिवसेनेचे विनायक राऊत सातव्या फेरी अखेर ५५८५१ मतांनी आघाडीवर आहेत. येथील रेल्वे गोडाऊनमध्ये मतमोजणी सुरु आहे. शिवसेना, स्वाभिमान आणि काँग्रेससह वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांसाठी जागा निश्चित करून दिली होती. सकाळच्या सत्रात गर्दी कमी होती. मात्र 12 वाजल्यानंतर शिवसेनेच्या गोटातील गर्दी वाढू लागली.

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील  मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली असून 7 हजार 595 टपाल मतदान आहेत. सुरुवातीला १००० मतमोजणीनंतर शिवसेनेचे विनायक राऊत आघाडीवर होते.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या  मतमोजणी वाटद जिल्हा परिषद गटातून झाली. सेनेचे राऊत 841 मतांनी आघाडीवर होते. पहिल्या फेरी अखेर 7 हजार 631 मतांनी राऊत आघाडीवर गेले. 

दुसऱ्या फेरी अखेर 16 हजार  924 मतांनी राऊत आघाडीवर आल्यानंतर शिवसेनेची गर्दी वाढू लागली. सुरवातीला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नव्हता. त्यानंतर म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, आमदार राजन साळवी, राजू महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरूपा साळवी आणि शिवसैनिकांची गर्दी वाढु लागली.  

पहिल्या फेरीपासून राऊत यांनी आघाडी घेतल्यामुळे शिवसैनिक हळूहळू मतमोजणी केंद्राकडे वाळू लागले. जल्लोष, घोषणा यासह ढोलताशे वाजू लागले. पाचव्या फेरीला आघाडी घेतल्यानंतर आमदार सामंत यांना पेढे भरवून आमदार साळवी यांनी आनंद साजरा केला. शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते तर स्वाभिमानसह अन्य पक्षात सन्नाटा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com