Loksabha 2019 : लोकसभेसाठी एकही जागा मिळाली नाही तरी आठवले समाधानी

दिनेश पिसाट
गुरुवार, 21 मार्च 2019

शरद पवार - राज ठाकर यांच्‍या एकत्र येण्‍याने फरक पडणार नाही. शरद पवार आणि राज ठाकरे यांची भेट झाली असली तरी या दोघांची माझी भेट झाली नाही. दोघे एकत्र आले तरी आमची आघाडी मजबूत आहे त्‍यामुळे काही फरक पडणार नाही. 

- रामदास आठवले, अध्‍यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

रायगड - भाजप -शिवसेना युतीने लोकसभेसाठी एकही जागा आम्हाला दिली नाही, तरी आपण समाधानी आहोत, अशी स्पष्टोक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्‍यक्ष रामदास आठवले यांनी केली. राज ठाकरे - शरद पवार एकत्र आले तरी फरक पडणार नाही असेही ते म्हणाले.

महाड येथे सत्‍याग्रह दिन कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. आठवले म्हणाले, आपण केंद्राच्‍या पाच वर्षांतील कामगिरीवर समाधानी आहोत. त्‍यामुळे आपण नाराज नसून आघाडीसोबत राहणार आहोत.  या निवडणूकीत आम्‍हाला जागा मिळाली नसली, तरी राज्‍यसभेबरोबरच मंत्रीपदही मिळणार आहे. तसेच राज्‍याच्‍या विधानसभा निवडणूकीत काही जागा मिळतील, महामंडळांवरदेखील कार्यकर्त्‍यांना संधी मिळेल, असे आठवले म्‍हणाले.

शरद पवार - राज ठाकर यांच्‍या एकत्र येण्‍याने फरक पडणार नाही. शरद पवार आणि राज ठाकरे यांची भेट झाली असली तरी या दोघांची माझी भेट झाली नाही. दोघे एकत्र आले तरी आमची आघाडी मजबूत आहे त्‍यामुळे काही फरक पडणार नाही. 

- रामदास आठवले, अध्‍यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

चौकीदारवरून टीका झाली तरी सरकार एनडीएचेच येणार, असा विश्वास व्यक्त करत श्री. आठवले म्हणाले, चौकीदारच्‍या मुद्यावरून राहुल गांधी टीका करत असले तरी आता सगळेच मी चौकीदार असे म्‍हणू लागलेत. घराचं, सरकारचं, राहुल गांधींचं संरक्षण करायचं तर चौकीदार पाहिजे. त्‍यामुळे पुन्‍हा देशात एनडीएला सव्‍वातीनशेच्‍या आसपास जागा मिळतील,असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athawale comment