...तर मी गीतेंच्या विरोधात निवडणूक लढविणार नाही - तटकरे 

...तर मी गीतेंच्या विरोधात निवडणूक लढविणार नाही - तटकरे 

दाभोळ - मतदारसंघात रोजगार निर्मीती करण्यासाठी माझ्या खात्यातर्फे कारखाना आणणार होतो, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याला विरोध केला म्हणून मला हा कारखाना आणता आला नाही असे खासदार अनंत गीते सांगतात. आता निवडणुका जाहीर होतील, तेव्हा प्रचाराच्या भाषणात त्यांनी  हे वाक्‍य बोलून दाखवायची हिंमत दाखवावी. मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणार नाही, असे आव्हान माजी मंत्री सुनील तटकरे यांनी श्री. गीते यांना केले.

उन्हवरे येथे काल (ता.7) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्या झाला. त्यामध्ये ते बोलत होते. श्री. तटकरे म्हणाले, बीएसएनएलने बिले न भरल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. दापोली तालुक्‍यातील अनेक दूरध्वनी केंद्रे तसेच टॉवरला याचा फटका बसला आहे. याचा परिणाम ग्रामीण भागात झाला आहे. गीते हे गेली 30 वर्षे खासदार व 10 वर्षे केंद्रीय मंत्री असूनही त्यांना यावर काहीही उपाययोजना करता आलेली नाही. त्यामुळे ते पुढील 5 वर्षात या भागाचा विकास कसा करणार, असा सवाल तटकरे यांनी केला 

केंद्रीय अवजड उद्‌योगमंत्री अनंत गीते यांनी 10 वर्षे केंद्रात मंत्री म्हणून काम केलेले आहे. तरी त्यांना उन्हवरे वावघर येथे 100 मीटर रस्त्याच्या उद्‌घाटनाला यावे लागते, यासारखे दुर्दैव नाही. 100 मीटर रस्त्याच्या कामाचे उद्‌घाटन पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत सदस्याने करणे अपेक्षित आहे. त्यामुळे गीतेंच्या पायाखालची वाळू घसरू लागली असल्याचे हे लक्षण असल्याचे श्री. तटकरे म्हणाले. 

श्री. गीते यांनी चार वर्षापूर्वी माणगाव (जि. रायगड) येथील मेळाव्यात मतदारसंघातील प्रत्येक तालुक्‍याला कार्डीऍक रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती, मात्र निवडणुका जाहीर होण्याच्या तोंडावर त्यांनी अलिबाग येथे काही रुग्णवाहिका दिल्या. मात्र त्या साध्या होत्या त्याही कंपन्यांच्या सीएसआर फंडातून त्यामुळे खासदार गीते यांनी मतदार संघातील मतदारांना केवळ पोकळ आश्‍वासने देण्याशिवाय काहीच केले नाही, अशी टीकाही श्री. तटकरे यांनी केली. 

श्री. गीते यांनी 2014 च्या निवडणुकीत मतदार संघात कारखाना उभारणार असल्याची घोषणा केली होती, मात्र तोही चुनावी जुमलाच ठरला असून गीतेंकडे केंद्रीय मंत्रीपद असूनही त्यांनी खासदार निधीव्यतीरिक्‍त अन्य निधीच या मतदारसंघात आणला नसल्याचे श्री. तटकरे म्हणाले. 

2015 मध्ये दापोलीतील नवभारत छात्रालयात झालेल्या कार्यक्रमात दापोलीत कृषी पर्यटन केंद्र व हेल्थ सेंटर आणण्याची घोषणा श्री. गीते यांनी केली होती. 2019 सुरू होऊन निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्याची वेळ आली, तरी गीते यांना कृषी पर्यटन केंद्र व हेल्थ सेंटर सुरू करता आलेले नाही, असेही श्री. तटकरे म्हणाले. 

राज्याचा अर्थमंत्री असताना कोकणासाठी अर्थसंकल्पातील 50 टक्‍के निधी आपण दिला होता. वाडीजोड रस्ता प्रकल्प व साकव कार्यक्रम आपणच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुरू केले होते. अशी विकास कामे करणे अपेक्षित होते. पण गीते केंद्रीय अर्थराज्यमंत्री असतानाही त्यांना या मतदारसंघासाठी निधी आणता आला नाही. यासाठी मला एकदाच संधी द्‌या, खासदार करा आपण केंद्रशासनाच्या अनेक योजनांचा पाऊस या मतदारसंघात पाडू 
- सुनील तटकरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com