गीतेंची सोंगे मतदार सहन करणार नाहीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

योजनांचा स्पर्श मतदारसंघाला झालाच नाही
राजकीय पराभव दिसू लागल्याने गीतेंनी साडेचार लाखांच्या रुग्णवाहिका वाटपाचा कार्यक्रम मतदारसंघात सुरू केला आहे. केंद्र सरकारच्या असंख्य योजना आहेत. पण ह्या योजनांचा स्पर्श मतदारसंघाला झालेला नाही.

गुहागर - सामाजिक आणि भावनिकतेवर आजवर जिंकत आलेल्या गीतेंची ही सोंगे आता मतदार सहन करणार नाही. यापुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नाही, तर मोदींच्या नावाने मते मागण्याची वेळ आता शिवसेनेवर येणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली. ते गुहागरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. 

पालपेणे रस्त्यावरील भवानी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुहागर विधानसभा कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. मेळाव्यात रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

तटकरे म्हणाले, १० वर्ष केंद्रात मंत्री राहिलेल्या गीतेंना केंद्र सरकारचा निधी मतदारसंघात आणता आला नाही. गेल्या साडेचार वर्षात ते कोणाला दिसले नाहीत. कोणाच्या सुख-दुःखात सहभागी झालेले कोणी पाहिले नाहीत. त्यांनी घोषणा केलेल्या कारखान्याचा पत्ताच नाही. जनतेतून विचारणा झाल्यावर महाराष्ट्रात कारखाना आणण्यास मोदींचा विरोध होता, असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न करतात, परंतु पाच वर्षांत मोदींच्या नजरेला नजर मिळविण्याची त्यांची हिंमतच झाली नाही.  मी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. जे ३५ वर्षात घडले नाही, ती कसर भरून काढण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. 

या वेळी आमदार भास्कर जाधव, संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, जि.प. सदस्या नेत्रा ठाकूर, सभापती पूनम पाष्टे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

योजनांचा स्पर्श मतदारसंघाला झालाच नाही
राजकीय पराभव दिसू लागल्याने गीतेंनी साडेचार लाखांच्या रुग्णवाहिका वाटपाचा कार्यक्रम मतदारसंघात सुरू केला आहे. केंद्र सरकारच्या असंख्य योजना आहेत. पण ह्या योजनांचा स्पर्श मतदारसंघाला झालेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Tatkare comment