Loksabha2019 : राज्यात १२४ कोटींचा मुद्देमाल जप्त

Loksabha2019 : राज्यात १२४ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई -  राज्यात आचारसंहिता कालावधीत पोलिस, प्राप्तिकर विभाग, उत्पादन शुल्क कर विभाग आदी विभागांकडून काटेकोर कार्यवाही सुरू आहे. या विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सोमवारी दिली.

यामध्ये ४६ कोटी ६२ लाख रुपये रोकड, २३ कोटी ९६ लाख रुपये किमतीची ३ कोटी ८ लाख ७९३ लिटर दारू, ७ कोटी ६१ लाख रुपयांचे मादक पदार्थ, ४५ कोटी ४७ लाख रुपयांचे सोने, चांदी यांचा समावेश आहे. आचारसंहिता भंग व निवडणूक प्रक्रियेशी निगडित इतर स्वरूपाचे २२ हजार ७९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये पोलिस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कालमांतर्गत ४१६ गुन्हे, लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत ७६ गुन्हे, अनधिकृतरीत्या दारू बाळगणे, विक्री, वाटपासाठी दारूची वाहतूक अशा स्वरूपाचे १४ हजार ५८३ गुन्हे, बेकायदा शस्त्रनिर्मिती, विक्री, त्याचे प्रदर्शन, शस्त्र जवळ बाळगणे आदींबाबत ७४७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नशेचे पदार्थ बाळगल्याबाबतचे १२६, स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत १२ गुन्हे, अन्न व औषध अधिनियमांतर्गत ६०, मालमत्तेचे विद्रूपीकरणाअंतर्गत ६६ आणि इतर २८ गुन्ह्यांचा समावेश आहे.

‘सी-व्हिजिल’ ॲपवर साडेतीन हजार तक्रारी
‘सी-व्हिजिल’ ॲपवर आतापर्यंत तीन हजार ५६१ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी दोन हजार ३४ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून, त्यामध्ये जिल्हास्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे. मतदारांना आमिष म्हणून दारूचे वाटप, पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, मालमत्तेचे विद्रूपीकरण आदी स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com