Loksabha 2019 : पहिल्या टप्प्यासाठी १५ हजार मतदान केंद्रे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. आठवड्यावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी  सुरू आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. आठवड्यावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी  सुरू आहे. 

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ११६ उमेदवार आहेत. सात मतदारसंघांत १४ हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत, तर १ कोटी ३० लाख ३५ हजार मतदार आहेत. त्यामध्ये ६६ लाख ७१ हजार पुरुष, तर ६३ लाख ६४ हजार महिला आणि १८१ तृतीयपंथी मतदार आहेत. सुमारे ४४ हजार ईव्हीएम यंत्रे आणि २० हजार व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत. सुमारे ७३ हजार ८३७ कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

राज्यात एकूण ४ टप्प्यांत मतदान होणार असून वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये ११ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. 

Web Title: 15 thousand polling booth for the first phase