Loksabha 2019 : रुसलेल्या वाघांची भाजपकडून मनधरणी 

Loksabha 2019 : रुसलेल्या वाघांची भाजपकडून मनधरणी 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून सत्ताधारी पक्षात नाराजीनाट्य सुरू झाले आहे. युतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेतील नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला असून, काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' बंगल्यावर खलबते सुरू होती. या वेळी नाराजांना त्यांच्या राजकीय ताकदीप्रमाणे राज्यसभा, विधान परिषदेवर स्थान देण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे समजते. 

उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेकडून डावलल्या गेलेल्या रवींद्र गायकवाड यांची फडणवीस यांनी समजूत काढली. लोकसभा निवडणुकीनंतर गायकवाड यांचा योग्य सन्मान करण्याचे आश्‍वासन त्यांना दिले. तसेच, पालघरमध्ये शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तबही याच बैठकीत करण्यात आले. 

"मातोश्री'वर काल दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी मध्यरात्री रवींद्र गायकवाड पोहचले. बैठकीला शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, उमरग्याचे आमदार ज्ञानेश्वर चौघुले, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर राजेंद्र गावित, एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांची बैठक पार पडली. तीत पालघरबाबत चर्चा झाली. 

दरम्यान, आज दुपारी "मातोश्री'वर राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगा यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत गावित यांना पालघरची उमेदवारी देण्यात आली असून, वनगांची वर्णी विधिमंडळात लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com