Loksabha 2019 :  डान्सबार सुरू करणारे सरकार बदला - सुप्रिया सुळे 

Loksabha 2019 :  डान्सबार सुरू करणारे सरकार बदला - सुप्रिया सुळे 

सासवड - मराठी शाळा बंद करणारे आणि डान्सबार सुरू करणारे भाजप सरकार आता बदलण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी काही राज्यांत भाजप हरला अन्‌ न मागितलेले १० टक्के आरक्षण दिले. काही वस्तूंचे थोडे भाव कमी केले. त्यामुळे यांना देशात हरवा, जनतेला बरेच काही मिळेल, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारची खिल्ली उडवली.

सासवड (ता. पुरंदर) येथे हिवरे रस्त्यावरील सुप्रभा कंपनीतील महिला कामगारांशी खासदार सुळे यांनी संवाद साधला.  त्यानंतर संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीतळावर फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आदींशी संवाद साधत कोपरासभा घेतली. त्या वेळी सुळे बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जालिंदर कामठे, काँग्रेसप्रणीत आघाडीचे सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष संजय ग. जगताप, प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, माणिक झेंडे, सुदाम इंगळे, राहुल गिरमे, ॲड. कला फडतरे, विराज काकडे, बबन टकले, अरुण जगताप, शिवाजी पोमण आदींसह नागरिक उपस्थित होते. 

सुळे म्हणाल्या, ‘‘विरोधक सेल्फीवरून माझ्यावर टीका करतात. पण खड्डे बुजले ना. यांच्याकडे मुद्दे नाहीत. माणसेही नाहीत. आम्ही नाकारलेली माणसे यांनी स्वीकारली. यांचा पराभव निश्‍चित आहे.’’ 

या वेळी नगराध्यक्ष भोंडे, उपनगराध्यक्ष जगताप, य. बा. ताकवले, मनोहर साळवी, शिरवळकर आदींचे भाषण झाले. प्रास्ताविक ॲड. कला फडतरे यांनी केले. महेश जगताप यांनी आभार मानले.  

‘संजय जगताप शब्द पाळणारे’ 
सासवड पालखीतळावरील प्रचारसभेस काँग्रेसचे सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व उपनगराध्यक्ष संजय जगताप यांनी उपस्थित राहून सुप्रिया सुळे या अधिक मताधिक्‍याने विजयी होतील, अशा मदतीची ग्वाही देत सांगितले. काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत सुळे म्हणाल्या, ‘‘काँग्रेसचे पुरंदरचे नेते संजय जगताप हे दिलेला शब्द पाळणारे आहेत. त्यांनी आघाडीचे काम करणार, म्हणून शब्द दिला आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com