पुण्यात काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक; पवारांनी सुचविलेल्या नावावर राहुल यांची सहमती

पुण्यात काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक; पवारांनी सुचविलेल्या नावावर राहुल यांची सहमती

लोकसभा 2019 : मुंबई: महाराष्ट्रात काॅग्रेसला तगड्या उमेदवारांची वाणवा असल्याचे चित्र असताना पुणे लोकसभेत मात्र काॅग्रेस ‘मास्टरस्ट्रोक’ लगावणार असल्याचे संकेत आहेत. संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनाच पुणे लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरवणार असल्याचे जवळपास निश्चीत झाले असून काॅग्रेस अध्यक्ष राहूल गांधी व शरद पवार यांच्यात त्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. 

शरद पवार यांनीच प्रविण गायकवाड यांच्या नावाची शिफारस राहूल गांधी यांच्याकडे केली. ‘उमेदवार माझा असला तरी पक्ष मात्र तुमचा’ असे सांगत प्रविण गायकवाड यांचे नाव समोर केले. दरम्यान पुण्यातील व्यावसायिक सतिश मगर यांनाही विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनी नकार दिला. 

प्रविण गायकवाड यांच्याबाबत राहूल गांधीनी माहिती घेतली असता ‘गुजरात पॅटर्न’ च्या धर्तीवर त्यांचे नाव संयुक्तिक असल्याची राहूल यांची खात्री पटल्याचे सांगण्यात येते. गुजरात मधे राहूल गांधी यांनी हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर व जिग्नेश मेवानी यासारख्या सामाजिक चळवळीतल्या युवा नेत्यांसोबत आघाडी करून भाजप समोर आव्हान उभे केले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही बहुजन चळवळीतले प्रविण गायकवाड यांना काॅग्रेसमधे संधी देण्यावर सहमती झाल्याचे सांगण्यात येते. 

प्रविण गायकवाड यांचे केवळ पुण्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात तगडे नेटवर्क आहे. संभाजी ब्रिगेडच्या व्यासपिठावरून त्यांनी भाजप - शिवसेना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात आक्रमकपणे संघठन केले. राज्यातील सर्वच बहुजन जातीमधे त्यांना मानणारा प्रचंड मोठा युवा वर्ग आहे. 

सध्या ते शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस असून शरद पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. त्याच्या उमेदवारी बाबत शरद पवार यांनीच पुढाकार घेतल्याने राहूल गांधी देखील पुर्णत: सहमत असल्याचे सांगण्यात येते. 

सोशल मिडीयात त्यांच्या उमेदवारीची बातमी पसरल्यानंतर शेकडो समर्थकांनी त्याचे स्वागत केले आहे. त्यामुळे प्रविण गायकवाड यांच्या रूपाने काॅग्रेसला पुण्यातच नव्हे तर राज्यभरात एक मोठा संघठन, उत्तम आक्रमक वक्ता व अभ्यासू चेहरा मिळाल्याचे मानले जाते.

राज्यभरातील वक्ते ंमदतीला
काँग्रेसने प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी दिल्यास राज्यभरातून परखड मताचे वक्ते त्यांच्या मदतीला येण्याची शक्यता आहे. प्रवीण गायकवाड यांच्या संघटन असल्याने त्यांना सर्व स्तरातून मदत होणार हे निश्चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com