esakal | Election Results : महाराष्ट्रात मोदींचा ‘शत प्रतिशत’ सक्‍सेस रेट
sakal

बोलून बातमी शोधा

Modi-Politics

‘लावा रे तो व्हिडिओ’चे यश वीस टक्के 
‘लावा रे तो व्हिडिओ’ डायलॉगने गाजलेल्या राज ठाकरे यांच्या सभा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला दहापैकी आठ ठिकाणी विजय मिळवून देण्यात अपयशी राहिल्या. जुने व्हिडिओ आणि आपल्या भाषणांमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात दहा मतदारसंघांसाठी सभा घेतल्या होत्या.  राज ठाकरे यांनी यंदा लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर आपल्या सभांमधून शरसंधान साधले होते. राज्यातील नांदेड, सातारा, सोलापूर, पुणे, महाड, मुंबई, नाशिक, सोलापूर, पनवेल, खडकवासला आदी ठिकाणी या सभा झाल्या होत्या. सातारा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि रायगडमध्ये सुनील तटकरे यांनी मात्र विजयाला गवसणी घातली आहे.

Election Results : महाराष्ट्रात मोदींचा ‘शत प्रतिशत’ सक्‍सेस रेट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच 
मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेच्या ठिकाणचा सक्‍सेस रेट ‘झिरो’ राहिला. 

राज्यात प्रचाराचा धुरळा उठवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सात सभा घेतल्या. यात एक विदर्भ, दोन मराठवाडा, दोन उत्तर महाराष्ट्र, एक पश्‍चिम महाराष्ट्र तर मुंबईत एक सभा घेतली. सभा झालेल्या सर्वच मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. राहुल गांधी यांनीही राज्यात सात सभा घेत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले होते. यामध्ये मराठवाड्यात एक, विदर्भात दोन, पश्‍चिम महाराष्ट्रात दोन तर उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईत एक अशा सभा झाल्या. यातील एकाही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयाला गवसणी घालता आलेली नाही.

यांच्या लोकसभा निवडणूक निकालाआधी महाराष्ट्रात झालेल्या सभा 
नरेंद्र मोदी 

  वर्धा - १ एप्रिल २०१९ - रामदास तडस (भाजप) 
  नांदेड- ६ एप्रिल २०१९ - प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप)
  औसा, लातूर- ९ एप्रिल २०१९ - सुधाकर श्रृंगारे (भाजप)
  माढा- १७ एप्रिल २०१९ - रणजितसिंग नाईक निंबाळकर (भाजप)
  दिंडोरी- २२ एप्रिल २०१९ - डॉ. भारती पवार (भाजप)
  नंदूरबार - २२ एप्रिल २०१९ - हीना गावित (भाजप)
  मुंबई - २६ एप्रिल २०१९ - सहाही जागांवर युतीचा विजय

राज ठाकरे
१२ एप्रिल : नांदेड - आघाडी पराभूत 
१५ एप्रिल : सोलापूर - आघाडी पराभूत 
१६ एप्रिल : कोल्हापूर - आघाडी पराभूत 
१७ एप्रिल : सातारा - उदयनराजे भोसले
१८ एप्रिल : पुणे - आघाडी पराभूत 
१९ एप्रिल : महाड, रायगड - सुनील तटकरे 
२३ एप्रिल : काळचौकी, मुंबई - आघाडी पराभूत 
२४ एप्रिल : भांडुप (पश्‍चिम), मुंबई - आघाडी पराभूत  
२५ एप्रिल : कामोठे, पनवेल - आघाडी पराभूत 
२६ एप्रिल : नाशिक - आघाडी पराभूत

राहुल गांधी
नंदुरबार- १ मार्च - काँग्रेस पराभूत 
मुंबई- १ मार्च - काँग्रेस पराभूत 
नागपूर-४ एप्रिल - काँग्रेस पराभूत 
वर्धा-५ एप्रिल - काँग्रेस पराभूत
पुणे- ५ एप्रिल - काँग्रेस पराभूत
नांदेड-१५ एप्रिल - काँग्रेस पराभूत
संगमनेर-२६ एप्रिल - काँग्रेस पराभूत

loading image