Loksabha 2019: भाजपाची पहिली यादी 16 मार्चला जाहीर होणार

Loksabha 2019: भाजपाची पहिली यादी 16 मार्चला जाहीर होणार

मुंबई- काँग्रेसने लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या दोन याद्या जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली. या धर्तीवर आता भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी 16 मार्च रोजी जाही होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत 17 ते 18 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता असून, 2014 साली निवडून आलेल्या उमेदवारांपैकी पाच ते सहा जणांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आहे. शिवसेनेसोबतची युती निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपल्याकडील दोन जागा तडजोडीच्या स्वरूपात सेनेला दिल्या होत्या. काही ठिकाणी भाजप खासदारांबाबत नाराजी असल्याने अशा मतदारसंघात उमेदवार बदलण्याची चर्चाही शिवसेनेसोबत सुरु असल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत मित्रपक्षांनाही भाजपच्या खात्यामधून 1 ते दोन जागा सोडल्या जाऊ शकतात असे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे. आता 16 मार्च रोजी भाजपची यादी जाहीर झाल्यावर कोणकोणत्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापले जाते आणि कोणाकोणाला परत तिकीटाचा आशिर्वाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com