Loksabha 2019 :  इंदापूर काँग्रेसचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

इंदापूर - मागील लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांना ३६ टक्के मतदान होऊनही सरकार सत्तेवर आले. विरोधकांना ६१ टक्के मते पडूनदेखील मतविभागणी झाल्यामुळे सत्ता गेली. त्यामुळे बहुतांश कार्यकर्त्यांचा विरोध असतानादेखील सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय इंदापूर तालुका काँग्रेसने घेतल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापुरात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे येथे मला भेटले. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, आमदार विश्‍वजित कदम, उल्हास पवार यांच्यासमोर काँग्रेसची भूमिका मांडली. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतदेखील आघाडी करून आघाडीधर्माचे पालन झालेच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका या वेळी मांडली. राहुल गांधी व शरद पवार याबाबत जो अंतिम निर्णय घेतील; तो सर्वांनी मान्य करायचा निर्णय या वेळी घेण्यात आला. त्यामुळे सुळे यांना पाठिंबा देऊन प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.’’

Web Title: Indapur Congress support to Supriya Sule