Loksabha 2019 : भाजपचे आणि यूपीएलचे संबंध उघड - सावंत

Sachin-Sawant
Sachin-Sawant

मुंबई - युनायटेड फॉस्फरस लि. (यूपीएल) कंपनीच्या कार्यालयात बेकायदा भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचा काळा धंदा कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणल्यानंतर भाजपचे आणि युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीचे संबंध किती घनिष्ठ आहेत, याचे नवनवीन पुरावे समोर येत आहेत. यातून या दोघांचे आर्थिक लागेबांधे आहेत हे स्पष्ट असून, याची चौकशी करण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्षातर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या कंपनीशी भाजपच्या असलेल्या संबंधांबाबत कितीही हात झटकले तरी, पीयूष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल हे या कंपनीचे संचालक आहेत, ही वस्तुस्थिती पीयूष गोयल यांना नाकारता येणार नाही. तसेच खासदार संजय काकडे या कंपनीत व्यावसायिक भागीदार आहेत, ही वस्तुस्थिती कशी नाकारणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com