Loksabha 2019 : आम्ही मनाने दूर नव्हतोच

Devendra-and-Uddhav
Devendra-and-Uddhav

औरंगाबाद - शिवसेना- भाजप हे दोन्ही पक्ष मनाने कधीच दूर नव्हते. दोघांमध्ये हिंदुत्व हा एकमेव धागा आहे. आता युती झाल्याने व्यक्‍तीकडे न पाहता, महाभारतातील अर्जुनाला फक्‍त माशाचा डोळा दिसत होता, तसे फक्‍त युतीचा विजयच पाहायचा आहे. जेथे धनुष्यबाण असेल तिथे फक्‍त धनुष्यच आणि कमळ आहे तिथे फक्‍त कमळाकडे लक्ष ठेवून युती भक्‍कम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी औरंगाबादच्या ‘श्रीहरी पॅव्हेलियन’ येथे विभागीय संयुक्त मेळावा झाला. 

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले, की निवडणुका येतात नि जातात; मात्र दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ दिले जाणार नाही. सरकारने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनी एकही जनावर चाऱ्यावाचून राहणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. औरंगाबादचा समांतर जलवाहिनीचा प्रश्‍न युतीचेच सरकार सोडवेल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंविरोधात पुकारलेले बंड मागे घेत असल्याची घोषणा केली. दोन्ही नेत्यांचे मनोमिलन झाल्याने ते आता लोकसभेला एकत्र सामोरे जातील; परंतु दोन वर्षांपासून आपापले झेंडे घेऊन संघर्षाला सामोरे जाणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र मोठी पंचाईत झाली आहे.  ऐन निवडणुकीच्या काळात नेमका कोणता झेंडा घेऊन लढायचे, याविषयीचाच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.

ठाकरेंचा दावा
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘दोन्ही पक्षांचे मनोमिलन करण्यासाठी आपण एकत्र आलो असून, भगवा आणि हिंदुत्व यापासून आपण दूर जाऊच शकत नाही. मतभेद असले, तरी शिवसेना सरकारच्या विकासाच्या आड कधीच आली नाही. आम्ही टीकाही समोरून केली आणि मैत्रीही चोरून केली नाही. पाच वर्षांचा संघर्ष विसरून संभाजीनगरचे औरंगाबाद होऊ देऊ नका.’’ या वेळी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पाच वर्षांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com