Loksabha 2019 : आयोगाकडून अपक्षांसाठी १९८ चिन्हे उपलब्ध

Election-Commission-Office
Election-Commission-Office

मुंबई - लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये (सिम्बॉल्स) यंदा दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. १९८ निवडणूक चिन्हे अपक्षांसाठी उपलब्ध असतील.

२०१४ च्या निवडणुकांमध्ये ८७ मुक्त चिन्हे होती; त्यापैकी काही चिन्हे वगळून आणि नव्याने समावेश करून यावर्षी १९८ मुक्त चिन्हे निवडण्याची संधी उमेदवारांना निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. दैनंदिन वापरातील वस्तू, व्यक्तिगत साधने, दळणवळणाची साधने, फळे, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू, खेळ, कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रांतील साधनांचा मुक्त चिन्हांमध्ये समावेश करून आयोगाने सर्वसमावेशकता जपली आहे. जुन्या काळातील वाळूचे घड्याळ, दळणाचे जाते, उखळ, नरसाळे, धान्य पाखडण्याचे सूप, ग्रामोफोन, टाईपरायटर, डिझेल पंप ते आधुनिक काळातील लॅपटॉप, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राइव्ह, रोबोट, हेडफोन असा नव्या-जुन्याचा संगम या मुक्त चिन्हांमध्ये करण्यात आला आहे. 

अशी आहेत निवडणूक चिन्हे
ऊस शेतकरी (गन्ना किसान), नारळाची बाग, डिजेल पंप, ट्रॅक्‍टर चालविणारा शेतकरी, शेतीच्या मशागतीसाठीचे टीलर, विहीर, गॅससिलिंडर, गॅसशेगडी, रेफ्रिजरेटर, मिक्‍सर, हंडी, कढई, तळण्याची कढई (फ्राइंग पॅन), काचेचा ग्लास, ट्रे, कप-बशी, उखळ आणि खलबत्ता, शिमला मिर्ची, फुलकोबी, हिरवी मिरची, भेंडी, आले, मटार, फळांची टोपली, सफरचंद, द्राक्षे, नासपती (पीअर्स) बिस्कीट यांच्यासोबतच विविध क्षेत्रांतील चिन्हेही मुक्त चिन्हांमध्ये समाविष्ट आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com