Loksabha 2019 : महाराष्ट्रातील 48 मतदारसंघाचा आढावा एका क्लिकवर

Maharashtrache-Maharanangan
Maharashtrache-Maharanangan

देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी अशी लढत होत असून, जवळपास अनेक मतदारसंघातील चित्र स्पष्ट झालेले आहे. या सर्व मतदारसंघाचा आढावा आम्ही घेतला आहे.

मराठवाडा - नाराजी, अटीतटी, तुल्यबळ
औरंगाबाद

  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतून सुभाष झांबड. अब्दुल सत्तार यांचे बंडाचे निशाण.
  वंचित बहुजन आघाडीची जागा एमआयएमच्या वाट्याला. आमदार इम्तियाज जलील यांची तयारी.
  माजी खासदार उत्तमसिंग पवार ‘वंचित’कडून इच्छुक. 
  शिवस्वराज्य पक्षातर्फे आमदार हर्षवर्धन जाधव ही उभे राहू शकतात, यामुळे येथे चौरंगी लढतीची शक्‍यता. 

जालना
  भाजप-काँग्रेसमध्येच थेट लढत.
  भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात जालन्यात काँग्रेसकडून विलास औताडे रिंगणात.
  आमदार बच्चू कडूही सक्षम उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत.

लातूर
  काँग्रेसचे मच्छिंद्र कामत व भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्यातच लढत.
  पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व काँग्रेसचे माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला.

उस्मानाबाद 
  राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार राणा जगजितसिंह पाटील, शिवसेनेकडून माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, तर वंचित बहुजन आघाडीकडून अर्जुन सलगर रिंगणात.
  राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत 
  काँग्रेसच्या नेतेमंडळींना आपलेसे करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार पाटील यांच्यासमोर आव्हान. 

नांदेड
  शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना उमेदवारी.
  वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. यशपाल भिंगे यांच्या नावाची घोषणा.
  खासदार अशोक चव्हाण यांनाच पुन्हा रिंगणात उतरावे लागण्याची चिन्ह.
  काँग्रेस-भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी चुरशीची थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट .

परभणी 
  वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान रिंगणात असून ते नवखे.
  खासदार जाधव यांच्या कार्यपद्धतीमुळे पाथरीचे आमदार मोहन फड, परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, गंगाखेडमधील संतोष मुरकुटे नाराज.
  राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना जिल्हाध्यक्ष, आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासोबतच्या वादाचा फटका बसण्याची चिन्ह.

हिंगोली
  हिंगोलीसाठी शिवसेनेकडून हेमंत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. अद्याप काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला नसल्याने लढतीचे चित्र स्पष्ट नाही.

बीड
  भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत.
  गल्ली ते दिल्ली सत्ता, पंकजा मुंडे पालकमंत्री; तसेच इतर पाच आमदार अशी भाजपची जमेची बाजू.

विदर्भ - उमेदवारीचा तिढा, पण लढत उत्कंठावर्धक
नागपूर 

  हायव्होल्टेज लढत. केंद्रीय मंत्री 
नितीन गडकरी भाजपतर्फे रिंगणात. 
  पंतप्रधान मोदींविरुद्ध शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर बंड करणारे नाना पटोले काँग्रेसचे उमेदवार.

रामटेक 
  शिवसेनेकडून खासदार कृपाल तुमानेंना संधी.
  काँग्रेसची उमेदवारी अडकली अंतर्गत वादात.

भंडारा-गोंदिया
  नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी. 
  राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा मतदारसंघावर वरचष्मा.
  राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या उमेदवारीचा तिढा कायम. 

चिमूर-गडचिरोली
  भाजपतर्फे पुन्हा खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव ऊसेंडी यांच्यामध्ये लढत.

चंद्रपूर
  शिवसेना आमदार बाळू धानोरकरांनी राजीनामा देऊनही उमेदवारी नाही. 
  भाजपचे हंसराज अहिर यांच्याविरुद्ध काँग्रेसतर्फे विनायक बांगडेंना उमेदवारी.

वर्धा
  भाजपकडून पुन्हा खासदार रामदास तडस. 
  काँग्रेसतर्फे महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस रिंगणात.

अमरावती
  शिवसेनेचे खासदार आनंदरराव आडसूळ यांना पुन्हा उमेदवारी.
  अखेर नवनीत राणांच्या उमेदवारीने लढतीची अनिश्‍चितता संपुष्टात. 

यवतमाळ-वाशीम 
  शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याविरुद्ध काँग्रेसचे माणिकराव ठाकरे. 
  माणिकराव ठाकरेंच्या कौशल्याचा कस.

अकोला 
  भाजपकडून खासदार संजय धोत्रेंना पुन्हा संधी.
  काँग्रेसचा उमेदवार अनिश्‍चित. डॉ. अभय पाटील आणि झिशान हुसेन यांची नावे चर्चेत. 

बुलडाणा 
  वंचित बहुजन आघाडीमुळे तिरंगी लढतीची चिन्हे. 
  शिवसेनेकडून प्रतापराव जाधव यांना परत उमेदवारी. 
  राष्ट्रवादीतर्फे पुन्हा राजेंद्र शिंगणे रिंगणात. 

पुणे - पुणे वगळता चित्र स्पष्ट
पुणे

  भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी.
  काँग्रेसच्या वतीने निष्ठावंतांचा जोर वाढला 
  माजी आमदार मोहन जोशी, अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड यांच्यात रस्सीखेच. 
  भाजप-काँग्रेसच्या लढतीत राष्ट्रवादीची भूमिका ठरणार महत्त्वाची.
  नवमतदारांचा राहणार निवडणुकीवर प्रभाव.

बारामती 
  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यात सरळ लढत.
  रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन भाजपची यशस्वी खेळी. 
  दौंड, खडकवासला, पुरंदर या विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार सुळे यांना करावा लागणार संघर्ष. 
  राजकारणातील दोन जुन्या घराण्यांतील लढत ठरणार उत्कंठावर्धक.
  भाजप बारामतीमध्ये लावणार पूर्ण ताकद. 

शिरूर
  शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हे यांच्या रूपाने समर्थ पर्याय. 
  उमेदवारांच्या जातीवरून प्रचाराची रणधुमाळी सुरू. 
  आढळरावांचा सलग चौथा विजय रोखण्यासाठी अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांची प्रतिष्ठापणाला. 
  डॉ. अमोल कोल्हे यांच्या लोकप्रिय मालिकेवरून वाद.

मावळ 
  राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्यामुळे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यापुढे कडवे आव्हान.
  अजित पवार यांच्याकडून जुन्या समर्थकांची जुळवाजुळव; पुण्यातील फौज लावली मावळमध्ये कामाला.
  शेकापसोबत आघाडीमुळे राष्ट्रवादीची बाजू भक्कम. 
  पार्थ यांना अनुभवी बारणे यांच्याशी करावा लागणार संघर्ष.

पश्‍चिम महाराष्ट्र - बेबनाव अन्‌ चुरस
कोल्हापूर 

  आघाडी आणि युतीतही बेबनाव.
  युतीच्या पाच आमदारांबरोबरच जातीच्या राजकारणाच्या आरोपामुळे ही लढतही लक्षवेधी ठरणार.
  राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडीक विरुद्ध शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांच्यातच लढत. 
  काँग्रेसचा एक मोठा गट आणि राष्ट्रवादीतील नाराज मंडळी महाडीक यांच्या प्रचारापासून दूर.  

हातकणंगले 
  लढत पारंपरिक विरोधकांतच (राजू शेट्टी विरुद्ध धर्यशील माने)
  माने घराण्यातील धैर्यशील माने यांच्या रूपाने तिसरी पिढी शेट्टी यांच्या विरोधात. 
  जातीच्या राजकारणाच्या आरोपामुळे लढत लक्षवेधी ठरणार. 
  युतीच्या आमदारांची माने यांना किती मिळणार साथ यावर विजयाचे गणित.

सांगली 
  भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांना पुन्हा उमेदवारी.
  काँग्रेसचा उमेदवार ठरता ठरेना.
  विश्‍वजित कदम- विशाल पाटील, प्रतीक पाटील व पृथ्वीराज पाटील गटांकडून आरोप- प्रत्यारोप. 
  धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्याकडून संजय पाटील यांना आव्हान. 

सातारा
  राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार उदयनराजे भोसले यांची तिसऱ्यांदा उमेदवारी. 
  युतीच्या अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसला तरी नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली. 
  पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यास उदयनराजेंसाठी निवडणूक अवघड.
  माथाडींची मते, नव्याने तयार झालेला ‘मोदीवर्ग’ आणि भाजपची ताकद युतीसाठी जमेच्या बाजू. 

सोलापूर 
  तिरंगी लढतीमुळे चुरशीचा सामना. 
  विद्यमान खासदार बनसोडे यांना यंदा भाजपकडून ‘ना’.
  पराभवाचा कलंक पुसण्यासाठी सुशीलकुमार शिंदे सज्ज.
  भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या रूपाने लिंगायत समाजाचा उमेदवार.
  वंचित आघाडीच्या माध्यमातून ॲड. प्रकाश आंबेडकर सोलापुरात.
  सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री देशमुख यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची.
  दलित-मुस्लिम मतांचा कौल काँग्रेससाठी निर्णायक.

माढा
  राष्ट्रवादीने संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्याने युतीपुढे पेच.
  रणजितसिंह मोहिते- पाटील की रोहन देशमुख यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा. 
  महादेव जानकर यांना माढात त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर उभे राहण्यासाठी सूचित.

मुंबई - तगड्या आव्हानांचा सामना
उत्तर-मध्य मुंबई 

  भाजपच्या खासदार पूनम महाजन यांना पुन्हा उमेदवारी. 
      काँग्रेसतर्फे प्रिया दत्त रिंगणात, त्यांच्यापुढे तुटलेल्या संपर्काचे आव्हान.
   विशेष म्हणजे, या दोन्ही उमेदवारांचे वडील खासदार होते.

ईशान्य मुंबई (उत्तर-पूर्व)
  भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला ‘माफिया’ संबोधल्यामुळे कार्यकर्त्यांचे त्यांच्याविरुद्ध बंड. उमेदवार अनिश्‍चीत.
  राष्ट्रवादीतर्फे संजय दिना पाटील यांना उमेदवारी. 
  मराठी, गुजराती, मुस्लिम मतदार इथला निकाल निश्‍चित करतील.

दक्षिण-मध्य मुंबई
  शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे पुन्हा रिंगणात. 
  शेवाळेंची मतदारसंघावर पकड मजबूत. 
  काँग्रेसचा माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यावर भरवसा. 
  ‘मनसे’ची मते निर्णायक ठरण्याची शक्‍यता.

दक्षिण मुंबई 
  मारवाडी-गुजराती मतांचा प्रभाव असलेला मतदारसंघ.
  शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत, तर काँग्रेसतर्फे मिलिंद देवरा रिंगणात. 
  सावंत यांचा घटलेला संपर्क आणि देवरा यांचा जनसंपर्क हे निवडणुकीचे वैशिष्ट्य.

उत्तर- पश्‍चिम मुंबई (वायव्य) 
  शिवसेनेची खासदार गजानन कीर्तिकरांना उमेदवारी.
  काँग्रेसचा उमेदवार अद्याप अनिश्‍चित. 
  ही निवडणूक कीर्तिकरांसाठी आव्हानात्मक.

उत्तर मुंबई
  गुजराती मतदार सर्वाधिक असलेला हा मतदारसंघ भाजपचा गड. 
  भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींना उमेदवारी. 
  मागील वेळचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपम निवडणूक लढवतील की नाही, हा प्रश्‍न. 

उत्तर महाराष्ट्र - सरळ, काट्याच्या लढती
रावेर

  माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी भाजप नेतृत्व नाराज,तरीही त्यांच्या स्नुषा आणि खासदार रक्षा खडसे यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी. 

जळगाव
  भाजपची विधान परिषदेच्या सदस्या स्मिता वाघ यांना उमेदवारी. 
  गुलाबराव देवकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने रिंगणात उतरवले.

नंदुरबार 
  भाजपकडून डॉ. हीना गावित पुन्हा रिंगणात,
  त्यांचे वडील आणि माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर जबाबदारी. 
  आदिवासींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदारकीचा राजीनामा दिलेले के. सी. पाडवी काँग्रेसतर्फे रिंगणात. 

धुळे-मालेगाव 
  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पक्षांतर्गत विरोधकांवर मात, पुन्हा उमेदवारी. 
  काँग्रेसतर्फे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल रिंगणात. 

नाशिक
  शिवसेनेची पुन्हा खासदार हेमंत गोडसेंना संधी. 
  राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी खासदार समीर भुजबळ रिंगणात. 
  नाशिकचा विकास आणि मतांचे विभाजन यावर निकाल अवलंबून.

दिंडोरी
  राष्ट्रवादीतून भाजप प्रवेशानंतर काही तासांमध्येच डॉ. भारती पवारांना उमेदवारी. 
  दिंडोरीचे माजी आमदार धनराज महालेंना राष्ट्रवादीची उमेदवारी. 

नगर
  काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेशकर्ते डॉ. सुजय विखे-पाटील यांना भाजपची उमेदवारी.
  भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिलेंचे जावई आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादीतर्फे रिंगणात. 

शिर्डी 
  शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी. 
  काँग्रेसतर्फे आमदार भाऊसाहेब कांबळे रिंगणात.  कांबळे विखे-पाटील गटाचे.

कोठे दुरंगी-कोठे तिरंगी
भिवंडी 

  विकासाच्या मुद्द्यावरच प्रचार.
  काँग्रेसला करावी लागणार राष्ट्रवादीची मनधरणी. 
  युतीमुळे विद्यमान खासदार कपील पाटील यांचे पारडे जड.
  युती- आघाडीत सरळ लढत.  
  मेट्रो, कल्याण- मुरबाड रेल्वेमार्गाला मंजुरी, आठ पदरी बायपास हायवे रस्ते, टेक्‍सटाइल पॉलिसी आदी मुद्यांवर भाजपचा असेल प्रचार.

कल्याण  
  आघाडीचे बाबाजी पाटील व शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात थेट लढत. 
  आजवर मतदारसंघात युतीचेच पारडे जड.
  श्रीकांत शिंदे यांना वडिलांचा (पालकमंत्री एकनाथ शिंदे) संपर्काचा फायदा. 
  पाटील यांचे पालकमंत्री शिंदे यांच्याशी जवळीक असल्याने लढत फारशी चुरशीची न होण्याचे चित्र. 
  आगरी समाजासह मुस्लिम, उत्तर भारतीय, ब्राह्मण, कोकणी, मराठा, कुणबी, सिंधी समाजाची मते निर्णायक. 
  श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार नसल्याने विजयाचा मार्ग सुकर. 
  मागील दोन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर. 
  मुंब्रा, कळवा येथील मुस्लिम मते महत्त्वाची.

ठाणे 
  शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यामध्ये सरळ लढत.
  शिवसेनेला भाजपच्या, तर राष्ट्रवादीला काँग्रेसच्या नाराजीला सामोरे जावे लागणार.
  मोदी लाटेचा प्रभाव अद्याप कायम असल्याचा विश्‍वास युतीच्या कार्यकर्त्यांना.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग 
  युती (विनायक राऊत)- आघाडी (नवीनचंद्र बांदिवडेकर)- स्वाभिमान (नीलेश राणे) अशी तिरंगी लढत.
  पक्ष म्हणून प्रथमच लढणाऱ्या ‘स्वाभिमान’ला पारंपरिक मतांचे आव्हान
  शिवसेनेपुढे स्थानिक भाजपची नाराजी दूर करण्याचे आव्हान. 
  काँग्रेसकडून बांदिवडेकर यांच्या रूपाने नवा कोरा चेहरा. 
  नाणार प्रकल्पाचा मुद्दा कळीचा ठरणार.
  राणेंचा फक्त शिवसेनेलाच विरोध. 
  काँग्रेसची सर्वच आघाड्यांवर लढाई. 

रायगड 
  माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नावीद अंतुले सक्रिय. ते लवकरच शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याचा अनंत गीते यांचा दावा.
  कुणबी समाजाच्या मतांवर आघाडी घेणाऱ्या गिते यांचे पाठबळ वाढणार.
  वंचित आघाडीने सुमन कोळी यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे लढत तिरंगी होण्याची शक्‍यता. 
  लोकसभा मतदारसंघावर दोन वेळा शिवसेनेचे वर्चस्व असून आता बदलाचे जोरदार वारे.
  राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना बळ देण्यासाठी धर्मनिरपेक्ष आघाडीकडून मोर्चेबांधणी.

पालघर
  पालघरची उत्कंठा शिगेला. 
  कोणत्याही पक्षाची उमेदवार जाहीर नाही. त्यातच युतीमधून ही जागा शिवसेनेला दिली गेली असताना देखील शिवसेनेने बाकी उमेदवारांची नावे जाहीर केली असली तरी अद्याप ही जागा जाहीर न केल्याने ही जागा नक्की कुणाकडे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com