Loksabha 2019 : तुमच्या घरात पाळणा हलणार की नाही

NCP
NCP

मुंबई - ‘दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार, स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत पोस्टरबाजी करत भाजपला टोला लगावला. ‘बुरा न मानो होली है’ म्हणत ‘राष्ट्रवादी’ने मुंबईतल्या विविध भागांत पोस्टर लावले आहेत.

‘ज्यांना आम्ही नाकारलं त्यांना का गोंजारता, दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार? स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार?,’ असा सवाल ‘राष्ट्रवादी’ने पोस्टरच्या माध्यमातून केला आहे. अशी पोस्टर मुंबईतल्या विविध भागांत लावण्यात आली आहेत. लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरू आहे. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. त्यांना भाजपकडून नगर लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्‍यता आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपकडून माढा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. यासोबतच अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने ‘राष्ट्रवादी’ने मुंबईत ही पोस्टरबाजी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com