Loksabha 2019 : राष्ट्रवादीचा ‘युवा’ जोश

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 मार्च 2019

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा मतदारसंघांसाठी पाच युवा चेहऱ्यांना प्राधान्य देत उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये मावळमधून अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार यांना संधी मिळाली, तर शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे, नाशिकसाठी समीर भुजबळ, दिंडोरीमध्ये धनराज महाले, तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बीडमध्ये पक्षाने अगदी नवखा उमेदवार दिला असून, दिंडोरीमध्येही डाव्या पक्षासोबत आघाडी झाली नसल्याने राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला आहे. 

पार्थ पवार यांनी या अगोदरच प्रचार सुरू केल्याने त्यांची उमेदवारी निश्‍चित होती. तर बीडमध्ये दिग्गज नेत्यांनी लोकसभा लढवण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. दरम्यान, माढा व नगर या बहुचर्चित मतदारसंघांत अद्याप सक्षम उमेदवारांवर चर्चा सुरू असल्याने ते जाहीर करण्यात आलेले नाहीत. तर रावेर व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांत फेरबदलाचे संकेत असल्याने काँग्रेससोबत तिथे चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते. रावेरमध्ये काँग्रेसकडून प्रबळ दावेदार असून, रावेर काँग्रेसला सोडून काँग्रेसकडील रत्नागिरी-सिंधुदुर्ग राष्ट्रवादीला असा फेरबदल होईल असे संकेत आहेत. पार्थ पवार यांना मावळ लोकसभेची उमेदवारी दिली असली, तरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सर्व ताकद पणाला लावावी लागणार आहे.

२०१४ मध्ये अजित पवार यांचे निष्ठावंत लक्ष्मण जगताप यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ही लोकसभा लढविली होती. त्यांनी दोन लाखांहून अधिक मते घेतली. तर राष्ट्रवादीच्या राहुल नार्वेकरांना सव्वा लाख मते मिळाली. या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांनी पुन्हा या वेळी स्वतःच्या मुलाला मैदानात उतरविल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

तर डॉ. अमोल कोल्हे यांच्या रूपाने सुप्रसिद्ध चेहरा शिरूर मतदारसंघात देण्यामागे अजित पवार यांचीच रणनीती असल्याची चर्चा आहे. कोल्हे हे माळी समाजातील आहेत. एक अभिनेता म्हणून त्यांची जशी ओळख आहे, तशीच एक बहुजन विचारक म्हणून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नाशिकमधून समीर भुजबळ यांना पुन्हा उमेदवारी देताना सामाजिक समीकरण सांभाळण्याचेच धोरण राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारले आहे.

शरद पवारांची उद्या सभा
पिंपरी(पुणे) - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. १७) वाल्हेकरवाडीत होणार आहे.

पार्थ पवार, अमोल कोल्हे, समीर भुजबळ मैदानात
लोकसभेसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर
माढा, नगरच्या उमेदवारांचा पेच कायम 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 NCP Youth Candidate Politics