Loksabha 2019 : ‘भुंकणारी कुत्री शिकार करू शकत नाहीत’ - जितेंद्र आव्हाड

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 एप्रिल 2019

भुंकणारी शंभर कुत्री वाघाची शिकार करू शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. आव्हाड यांनी ट्‌विटरवरून पाटील यांच्यावर हल्ला चढवला.

मुंबई - भुंकणारी शंभर कुत्री वाघाची शिकार करू शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. आव्हाड यांनी ट्‌विटरवरून पाटील यांच्यावर हल्ला चढवला.

काल शनिवारी पंढरपूर येथे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. 

‘शरद पवार चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत राजकारण करतात. मात्र आता त्यांना दिल्लीत राहण्यासाठी नवे घर शोधावे लागेल, त्यांचे राजकारण संपवूण टाकू,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या टीकेला ‘राष्ट्रवादी’चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाडांनी ‘भुंकणारी शंभर कुत्री वाघाची शिकार करू शकत नाहीत हे जगमान्य आहे. ४० वर्षांत महाराष्ट्रात जे कोणी आले, पवार यांच्याबद्धल बोलले, परंतु पवार साहेब आहे तिथं आहेत; मात्र बोलणारे काही स्वतः संपले, तर काहींना नियतीने संपवले,’ असे 
आव्हाड म्हणाले.

Web Title: Loksabha Election 2019 Politics Jitendra Avadh Chandrakant Patil