Loksabha 2019 : वाद टाळण्यासाठी नेते दक्ष

Shivsena BJP
Shivsena BJP

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघांत वाद निर्माण होणार नाहीत, याची खबरदारी शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान, शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सुमारे १० ते १२ सभा घेणार असून, उद्या वर्धा येथे त्यांची पहिली सभा होणार आहे. तसेच ३ एप्रिल रोजी गोंदिया येथे मोदी यांची सभा होणार आहे. मोदींच्या दौऱ्यादरम्यान वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीने एकत्र निवडणूक लढविली होती. त्या वेळी भाजप २६ तर शिवसेनेने २२ जागा लढविल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत युतीमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत युतीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा युती झाली असताना शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी पालघरची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आली. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी २५/२३ फॉर्म्युला निश्‍चित झाला.

लोकसभा निवडणुकींचा कार्यक्रम झाल्यापासून दोन्ही पक्षांचे उमेदवार जाहीर झाले. किरीट सोमयांना शिवसैनिकांच्या असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर या एकमेव जागेवरील उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसला तरी हा वाद दोन दिवसांत निकाली निघेल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

राज्यातील ४८ पैकी कोणत्याही मतदारसंघात वाद निर्माण होणार नाही, याची खबरदारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे. सातारा मतदारसंघात शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने भाजपचे नरेंद्र पाटील शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. तसेच पालघरमध्येही शेवटच्या क्षणी पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या भाजप खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून मैदानात उतरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या दरम्यान पक्षातील वाद उफाळू नये, याकडे मुख्यमंत्री फडणवीस लक्ष ठेवून असल्याचे भाजपतून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com