Loksabha 2019 : राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी - शहा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

'न्यायालयाने समझोता एक्‍स्प्रेस प्रकरणात असिमानंदांपासून सर्वांना निर्दोष ठरविले आणि त्यांच्याविरुद्ध षड्‌यंत्र रचण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकारणासाठी हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद असा उल्लेख करून संपूर्ण जगात हिंदूंना बदनाम करणाऱ्या राहुल गांधी यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी,’ अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज केली.

नागपूर - ‘न्यायालयाने समझोता एक्‍स्प्रेस प्रकरणात असिमानंदांपासून सर्वांना निर्दोष ठरविले आणि त्यांच्याविरुद्ध षड्‌यंत्र रचण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकारणासाठी हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद असा उल्लेख करून संपूर्ण जगात हिंदूंना बदनाम करणाऱ्या राहुल गांधी यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी,’ अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज केली. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी लकडगंज येथील कच्छी विसा मैदानावर आयोजित सभेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रामटेकचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्यासह नागपुरातील भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

या वेळी अमित शहा म्हणाले, ‘ओमर अब्दुल्ला यांनी काश्‍मीरला वेगळा पंतप्रधान असायला हवा, असे म्हटले आहे. आम्ही सत्तेत असू किंवा नाही, पण जोपर्यंत भाजपचे अस्तित्व आहे, तोपर्यंत काश्‍मीरला हिंदुस्तानापासून कुणीही तोडू शकणार नाही. ३७० कलमही आम्ही उखडून फेकू.’

Web Title: Loksabha Election 2019 Rahul Gandhi Hindu Apologies Amit Shaha Politics