Loksabha 2019 : जागा न मिळताही आठवले खूश!

Ramdas-Athawale
Ramdas-Athawale

मुंबई - दक्षिण मध्य मुंबईची जागा मागणारे रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांची नाराजी संपली असल्याची शक्‍यता दिसून येते आहे. शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी रविवारी आठवले यांची भेट घेतली. या भेटीनंतर आठवले यांनी महायुतीचा प्रचार करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

आठवले यांनी दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईपैकी एक जागा मागितली होती. ईशान्य मुंबईतून भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसला, तरी दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण मध्य मुंबईत दलित मतदार निर्णायक आहे. धारावी, चेंबूर, अणुशक्तीनगर या क्षेत्रात दलित मतदारांची संख्या मोठी आहे. त्यात, आठवले यांना मानणारा मतदारही मोठा आहे. त्यामुळे आठवले यांनी एखादी जरी प्रचारसभा घेतली तरी त्याचा फायदा शेवाळे यांना होऊ शकतो. जर आठवले हे शेवाळेंच्‍या प्रचारात सहभागी झाले नाही तर त्याचा त्यांना फटका बसण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com