Loksabha 2019 : पवारांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा - तावडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना, पवार म्हणाले होते, की '2004 ला मनमोहनसिंग पंतप्रधान होतील, हे कोणाला वाटले नव्हते, कारण त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. मनमोहनसिंग त्या वेळी राज्यसभेत होते, त्यामुळे ते अचानक पंतप्रधान होऊ शकले.'' पवारांच्या या विधानाचा संदर्भ देऊन तावडे म्हणाले, की यंदा पवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत, पण ते राज्यसभेचे सदस्य आहेत. याचाच अर्थ पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे, ती त्यांनी बहुतेक आपल्या मुलाखतीत बोलून दाखविली असावी.
Web Title: Loksabha Election 2019 Sharad Pawar Prime Minister vinod tawde Politics