Loksabha 2019 : सुजयकडूनच प्रस्तावास नकार - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

बारामती शहर - सुजय विखे यास ‘राष्ट्रवादी’चे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी अजित पवार म्हणून मी स्वीकारायला तयार होतो. मात्र, सुजयनेच या प्रस्तावाला नकार दिला, असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला.

सुजयने राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढावे, असे त्याला मी स्वतः सांगितले होते; पण त्यानेच या प्रस्तावाला नकार दिल्याने आमचाही नाइलाज झाला,  मी सांगतो, सुजयला आत्ता माझ्यासमोर आणा, हे जर खोटं असेल तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवार बोलतात ते खरंच बोलतात..., असे पवार म्हणाले. 

ज्येष्ठ नेते शरद पवार हे पन्नास वर्षे सक्रिय राजकारणात आहेत, त्यांनी माढ्यातून माघार घेतली; कारण राज्यसभेची मुदत २०२० पर्यंत आहे. ती जागा विनाकारणच इतरांना द्यावी लागली असती, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असेही पवार म्हणाले. हवेचा रोख बघून शरद पवारांनी माघार घेतल्याचा आरोप निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. ज्यांच्या नावावर महाराष्ट्रात अनेकजण निवडून येतात, त्यांच्याबाबत असे विधान करणे चुकीचे आहे.

माढ्याबाबत एक दिवसात अंतिम निर्णय होईल. त्याबाबत चिंता करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांसह मावळ भागातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पार्थच्या नावाचा आग्रह धरला होता, सर्वांच्या भावनांचा आदर करूनच पार्थला उमेदवारी दिल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title: Loksabha Election 2019 Sujay Vikhe Patil Proposal Ajit Pawar Politics