विखे पाटलांची पुत्रहट्टामुळे कोंडी

Radhakrishna-Vikhe-Patil
Radhakrishna-Vikhe-Patil

मुंबई - ‘काहीही झाले तर मी निवडणूक लढवणारच. कोणताही पक्ष मिळाला नाही तर अपक्ष म्हणून उभा राहणार,’ असा हट्‌ट सुजय विखे यांनी कायम ठेवला असल्याने राधाकृष्ण विखे यांची राजकीय कोंडी झाली आहे. अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडावी यासाठी विखे पाटील यांनी आग्रही भूमिका घेतली असून, राष्ट्रवादीचे अडवणुकीचे धोरण मात्र कायम आहे.

सुजय यांना राष्ट्रवादीकडून लढण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्नदेखील सुरू केल्याची माहिती आहे. मात्र राधाकृष्ण यांचे काँग्रेस हायकमांडच्या नजरेत राजकीय वजन वाढले असताना स्वत:चा मुलगा दुसऱ्या पक्षातून उभा राहणे हे त्यांच्याच राजकीय भवितव्यासाठी अडचणीचे ठरू शकते अशी अटकळ बांधली जात आहे.

अजित पवारांशी चर्चा
दरम्यान, सुजय विखे यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याची तयारी चालविली आहे. अजित पवार यांच्याशी संपर्क करून त्यांनी तशा प्रकारची इच्छादेखील व्यक्‍त केल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र काँग्रेस -राष्ट्रवादीत आघाडी झालेली असल्याने काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे यांना विश्‍वासात घ्यावे लागेल, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा आहे. दरम्यान, सुजय विखे यांना गळाला लावण्याच्या  हालचाली भाजपकडून देखील सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com