Loksabha 2019: मनसेचा महाआघाडीत समावेश नाही ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 मार्च 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज (ता.14) पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कल्याण-डोंबिवली आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महाआघाडीत सामील झाली असती तर त्यांना या दोनपैकी एक जागा सोडण्यात येईल अशी चर्चा रंगत होती. त्यामुळे आता या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी आणि मनसे आघाडी होणार नाही असे बोलले जात आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज (ता.14) पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कल्याण-डोंबिवली आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महाआघाडीत सामील झाली असती तर त्यांना या दोनपैकी एक जागा सोडण्यात येईल अशी चर्चा रंगत होती. त्यामुळे आता या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी आणि मनसे आघाडी होणार नाही असे बोलले जात आहे.

तसेच, राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्याने मनसे लोकसभा लढणार नाही का ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यापूर्वीही राष्ट्रवादी मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे या चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादीने आज उमेदवारांची यादी जाहीर केल्याने तूर्तास या चर्चांना विराम मिळाला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी 20 मार्च रोजी लोकसभा निवडणुकांविषयी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. 

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत पार्थ पवार यांचे नाव नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (ता. 13) ही उमेदवारांची यादी जाहीर केली. परभणीतून राजेश विटेकर जळगांवमधून गुलाबराव देवकर, बुलढाण्यामधून राजेंद्र शिंगणे, साताऱ्यामधून खा. उदयनराजे भोसले ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील, बारामतीमधून खा. सुप्रिया सुळे रायगडमधून सुनिल तटकरे, कोल्हापूरमधून खा. धनंजय महाडिक ठाण्यातून आनंद परांजपे  कल्याणमधून बाबाजी बाळाराम पाटील तर लक्षद्विपमधून खा. मोहम्मद फैजल अशी राष्ट्रवादीची पहिल्या दहा उमेदवारांची यादी आहे.

Web Title: MNS not Likely to be part Of Congress NCP Allaince