'मी, आजपासून खरं बोलणार...'

ncp jayant patil tweets april fools cartoon against narendra modi
ncp jayant patil tweets april fools cartoon against narendra modi

पुणेः 'मै झूठ का साथ निभाता चला गया.. हर रोज मै 'फूल' बनाता चला गया !' या शीर्षकाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक छायाचित्र ट्विट केले आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये 'आज से मै सच बोलूंगा, 'सच' के अलावा कुछ नही बोलूंगा!' असा मजकूर लिहिलेला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यंगचित्र व कॅलेंडरवर 1 एप्रिल फूल डे असे दाखवण्यात आले आहे.'

संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज (सोमवार) एप्रिल फूल दिवस असून, अनेकजण विरोधकांवर टीका करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसनेही ट्विट केले आहे. राष्ट्रवादीने 'This time don't forget to vote against 'BURE DIN'.. ' या शीर्षकाखाली एक इमेज शेअर केली आहे. इमेजमध्ये एक गाजर दाखवण्यात आले आहे. शिवाय, 'अच्छे दिन तो दिखे नही, बुरा दिन हर रोज आया... एप्रिल फूल बनाया' असे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com