Loksabha 2019: विखे पाटील म्हणाले कोणतं बटन दाबू? (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
सोमवार, 29 एप्रिल 2019

काँग्रेसमधील नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान करताना विखे पाटील यांनी उपस्थितांना 'कोणतं बटन दाबू?' असा मिश्किल प्रश्न विचारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

प्रवरानगर: काँग्रेसमधील नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान करताना विखे पाटील यांनी उपस्थितांना 'कोणतं बटन दाबू?' असा मिश्किल प्रश्न विचारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, विखे पाटील काँग्रेसवर नाराज असून नगर दक्षिण मतदारसंघानंतर शिर्डीतही विखेंना काँग्रेसविरोधी भूमिका घेतल्याची चर्चा सध्या आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महिन्यांपूर्वीच विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला होता. तो स्वीकारण्यातही आला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: radhakrushna vikhe patil voting in shirdi Loksabha constituency