युतीत भाजपच असेल मोठा भाऊ

 युतीत भाजपच असेल मोठा भाऊ

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढणार असल्याचे आज देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करताना सांगितले. त्यामुळे आता एकूणच मोठा भाऊ आणि छोटा भाऊ या चर्चेला विराम मिळाला असून लोकसभा निवडणुकीसाठी तरी भाजपच मोठा भाऊ असणार आहे.

स्वबळाचा निर्धार करणारी शिवसेना आणि पटक देंगेचा इशारा देणारी भाजपा अखेर एकत्र आली आहे. लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याची औपचारीक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

आगामी लोकसभेमध्ये भाजपच मोठा भाऊ असणार आहे. लोकसभेमध्ये भाजपला 25 तर शिवसेना 23 जागा देण्याचा युतीचा फॉर्मुला ठरला आहे. विधानसभेमध्ये दोन्ही पक्षाला अर्ध्या-अर्ध्या जागा वाटपाचं ठरलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com