Loksabha 2019 : ‘पीएम नरेंद्र मोदी’ला तूर्त मनाईची मागणी

Loksabha 2019 : ‘पीएम नरेंद्र मोदी’ला तूर्त मनाईची मागणी

मुंबई - लोकसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तूर्तास मनाई करण्याच्या मागणीची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. याबाबत न्यायालयाने चित्रपटाचे निर्माते, केंद्रीय निवडणूक आयोग आणि सेन्सॉर बोर्ड यांना खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्या. नरेश पाटील आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी झाली.‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाला आपला विरोध नाही; मात्र या चित्रपटाचा प्रभाव मतदारांवर पडू नये आणि निवडणूक पारदर्शी पद्धतीने व्हावी म्हणून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तूर्तास मनाई करावी, असे याचिकादारांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com