मतदारांसाठी रंगीत ओळखपत्र

Colour-Voter-ID-Card
Colour-Voter-ID-Card

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) वाटप करण्यास सुरवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे 46 लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून, अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले. उर्वरित ओळखपत्रे मतदानापूर्वी मतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्‍यक आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वैध मतदार छायाचित्र असणे आवश्‍यक आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारास ओळखपत्र दिले आहे. यापूर्वी संगणकावर मुद्रित केलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात येत होते; परंतु आता आकर्षक असे, रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइल क्‍लोराइड (पीव्हीसी) ओळखपत्र देण्यात येत आहे.

नवीन ओळखपत्राचे स्वरूप
या वर्षी आतापर्यंत सुमारे 46 लाख मतदारांसाठी नवीन ओळखपत्र तयार करून वाटपासाठी वितरित करण्यात आले आहे. नवीन ओळखपत्रासाठी मागणी केलेल्या अर्जातील एकूण 98 टक्के मतदारांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. 2014 मध्ये टक्केवारी 94 इतकी होती. या ओळखपत्रावर मतदाराचे नाव, छायाचित्र, जन्मतारीख, पत्ता, लिंग आणि मतदाराचा विशिष्ट ओळख क्रमांक आदी माहिती छापली आहे. त्याचबरोबर बारकोड असल्यामुळे बनावट ओळखपत्राला आळा बसणार आहे. हे ओळखपत्र पीव्हीसीपासून तयार केले असले तरी ते स्मार्ट कार्ड नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com