Loksabha 2019 : अब्दूल सत्तारांचा मुक्काम मुंबईतच

माधव इतबारे
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे बुधवारी (ता. तीन) एकाच विमानाने मुंबईला गेले होते. सत्तार यांनी गुरुवारी (ता. चार) सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सत्तार मुंबईतच थांबले; तर रावसाहेब दानवे हेलिकॉप्टरने औरंगाबादला परतल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या दुसऱ्या भेटीनंतर सत्तार आपल्या अपक्ष उमेदवारीबाबत काय निर्णय घेतात, याची उत्सुकता मात्र कायम आहे. 

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसने आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड करीत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी रात्री पावणेदोन वाजता मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत कॉंग्रेसला इशारा दिला होता.

त्यानंतरही कॉंग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले म्हणून सत्तारांनी अपक्ष अर्जही भरला; तर दुसरीकडे झांबड यांच्या नावे "बी फॉर्म' आला. बुधवारी सत्तार व रावसाहेब दानवे हे रात्री साडेदहा वाजता औरंगाबाद विमानतळावर भेटले. तासभर चर्चा केल्यानंतर हे दोघेही एकाच विमानातून मुंबईला गेले. त्यामुळे आता सत्तार भाजपमध्ये प्रवेश घेऊनच परततात की काय? याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. यासंदर्भात दानवे यांच्याशी संपर्क साधला असता, "दोन राजकीय नेते एकत्रित जाऊ शकत नाहीत का? शरद पवार, राज ठाकरे एकाच विमानातून गेले होतेच ना?' असा प्रश्‍न करीत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. अब्दुल सत्तार यांचा भ्रमणध्वनी मात्र बंद होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abdul Sattar's stay in Mumbai