Loksabha 2019: 'देशात तिसऱ्या आघडीचे सरकार येणार'

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 4 एप्रिल 2019

- देशातील दलित-मुस्लीम यांची स्थिती अत्यंत वाईट
- आजपर्यंत या दोन्ही समाजाचा फक्त मतापुरता वापर
- आता जागा दाखविण्याची वेळ आली 
- देशात तिसरी आघाडी सरकार स्थापन करेल

 

नांदेड : देशातील दलित- मुस्लीम यांची स्थिती अत्यंत वाईट असून भाजप-शिवसेना आणि कॉग्रेस-राष्ट्रवादी यांनी आजपर्यंत या दोन्ही समाजाचा फक्त मतापुरता वापर केला, त्यांना आता जागा दाखविण्याची वेळ आली असून देशात तिसरी आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्वास समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबु असीम आजमी यांनी व्यक्त केला.

नांदेड लेकसभा निवडणूकीत समाजवादी व बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अब्दुल समद हे निवडणूक लढवीत असून त्यांच्या प्रचारार्थ अबु आजमी गुरूवारी (ता. 04) नांदेड दौऱ्यावर आल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आजमी यांनी कॉंग्रेस व अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली.

सुरवातीपासून काॅंग्रेसने दलित- मुस्लीम समाजाला भिती घालून फक्त मता पुरता वापर केला. शिवसेना- भाजप हे सांप्रादयीक असून ते देशाच्या घटनेला हात घालण्याचे काम करीत आहे. कॉग्रेसची निती चांगली असून नियत खराब आहे तर भाजपची निती व नियत दोन्ही खराब असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात सध्या कॉग्रेस कमजोर झाली असून मुस्लीम व दलित त्यांच्याासून दुरावला आहे. या निवडणुकीत तर त्याचा फटका बसणार असल्याने कॉग्रेसची अवस्था वेड्या हत्तीसारखी झाली आहे. या निवडणूकीत तिसरी आघाडी देशाच्या सत्तेवर बसेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष सय्यद मोईन, उमेदवार अब्दुल समद, बसपचे मनिष कावळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Web Title: Abu Azami Crticise Congress ncp allaince and shivsena Bjp also over Loksabha Election