Loksabha 2019 : उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दानवे यांनी घेतले राजुरेश्वराचे दर्शन 

दीपक सोळुंके 
मंगळवार, 2 एप्रिल 2019

जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपा-शिवसेना तसेच मित्र पक्ष महायुतीकडून आज मंगळवारी रावसाहेब दानवे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

लोकसभा 2019
भोकरदन (जि. जालना) : भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपा-शिवसेना तसेच मित्र पक्ष महायुतीकडून आज मंगळवारी (ता. 2) दानवे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तत्पूर्वी त्यांनी सकाळी त्यांनी राजुरेश्वराची पूजा करुण दर्शन घेतले.

खासदार रावसाहेब दानवे मोठे शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे सकाळी दानवे यांनी भोकरदन येथील निवासस्थानी कुंटुबासोबत देवाची पूजा केली तसेच राजूर येथील महागणपतीची आरती करून आशीर्वाद घेतले. निवासस्थानी त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांनी त्यांचे औक्षण करून पेढा भरविला. यावेळी दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, रेणू दानवे उपस्थित होत्या. दरम्यान दानवेंची उमेदवारी दाखल करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पंकजा मुंडे, रामदास आठवले, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार अतुल सावे, भागवत कराड, अनिरुद्ध खोतकर, भास्कर आंबेकर आदींची उपस्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

raosaheb danve

Web Title: Before applying for the candidature for loksabha election Raosaheb Danve visits Rajureshwar Temple