Auranagabad Loksabha 2019 : दुपारी चारपर्यंत 46.44 टक्के मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 एप्रिल 2019

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी दोनपर्यंत एकूण 46.44 टक्के मतदान झाले आहे. औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत आहे.

औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी दोनपर्यंत एकूण 46.44 टक्के मतदान झाले आहे. औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत आहे.

आज दुपारपर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात 48.12 टक्के, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात 46.11 टक्के, गंगापूर विधानसभा मतदारसंघात 48.17 टक्के, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात 45.68 टक्के, कन्नड विधानसभा मतदारसंघात 48.34 टक्के तर वैजापूर विधानसभा मतदारसंघात 42.22 टक्के मतदान झाले आहे.

दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदार संघात सोमवारी (ता.23) सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली.

Web Title: Aurangabad witnesses 28.71 percent voting for Loksabha 2019