Loksabha 2019 : 'पांडवाच्या कळपात अर्जुन परत आल्याने निवडणुकीची चुरस संपली'

महेश गायकवाड
मंगळवार, 2 एप्रिल 2019

भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेंच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खाेतकर यांच्या नाराजीबद्दल वक्तव्य केले. 

लोकसभा 2019
जालना : 'नाराज झालेले अर्जुन पांडवांच्या कळपात परत आल्याने जालना लोकसभा निवडणुकीची चुरस संपली असून रावसाहेब दानवेंसमोर राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचेच आव्हान बाकी राहिले आहे,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेंच्या प्रचार सभेत बोलताना मंगळवारी (ता. 2) म्हणाले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री अर्जुन खोतकर मंत्री बबनराव लोणीकर, मंत्री बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, संतोष दानवे, संदिपान भुमरे, अतुल सावे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

'शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खाेतकर नाराज झाले होते. त्यामुळे पांडवांचा अर्जुन कौरवाकडे चालला होता, पण शेवटी अर्जुनामध्ये रक्त पाडवांचं होतं आणि पाठीमागे पार्थ स्‍वरूप उद्धव आहे. उद्धव ठाकरेंनी गीता सांगितल्याबरोबर अर्जुनराव पांडवाच्या कळपात परत आले. त्यामुळे जालन्याची चुरस संपली आहे. आता निवडून येण्याचे आव्हान दानवेंसोर राहिलेले नाही. राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आणण्याचे एकमेव आव्हान असल्याचे' ते यावेळी म्हणाले. 

काँग्रेसचा जाहीरनामा एप्रिल फुल बनवणारा -
निवडणुक आली की काँग्रेस गरिबी हटवण्याचा नारा देते आणि निवडणुक झाल्यानंतर स्‍वतःची गरिबी हटवण्याच्या पलिकडे काहीच करत नाही. काँग्रेसेने घोषित केलेला जाहीरनामा मंगेरीलाल के हसिन सपने आहेत, जे कधीच पूर्ण होणार नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर यावेळी टिका केली.

Web Title: Chief Minister Fadnavis spoke at BJPs Loksabha campaign rally for Raosaheb Danvane