Loksabha 2019: बीडमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; तेच दिवे चटके देत असल्याची खंत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. पण, अलीकडे या पक्षात हुजरेगिरी करणाऱ्यांना स्थान आहे मात्र निष्ठावंत आणि समाजात स्थान असलेल्यांना किमंत नाही. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेर्स सोडून कुठलाही निर्णय घ्यावा, असा सूर त्यांचे समर्थक आळवित आहेत.

बीड : दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. पण, अलीकडे या पक्षात हुजरेगिरी करणाऱ्यांना स्थान आहे मात्र निष्ठावंत आणि समाजात स्थान असलेल्यांना किमंत नाही. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेर्स सोडून कुठलाही निर्णय घ्यावा, असा सूर त्यांचे समर्थक आळवित आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव विधानसभेचे आमदार आणि पक्षाचे विधिमंडळातील उपनेते प्रदेश उपाध्यक्ष जयदत्त क्षीरसागर अलीकडे पक्षावर नाराज असून पक्षापासून दूर आहेत. लोकसभा निवडणूक प्रक्रियेपासून देखील ते दूर आहेत. दरम्यान, त्यांनी आज समर्थकांचा मेळावा बोलविला आहे. समर्थक वरील मत व्यक्त करत आहेत.

तेच दिवे चटके देत आहेत
दरम्यान, व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर एक बाजूला लढा आणि दुसऱ्या बाजूला आमदार जयदत्त क्षीरसागर आणि बंधू नगराध्यक्ष डॉ. भरातभूषण क्षीरसागर यांची छायाचित्रे आहेत. त्यावर 'वादळात ज्या दिव्यांची काळजी घेतली तेच दिवे आता चटके देत आहेत...' हा मजकूर त्यांच्या भावना आणि आगामी वाटचालीची दिशा दाखवीत आहे.

Web Title: jaydatta kshirsagar will clarify his role about NCP