Loksabha 2019 : खोतकर-दानवे यांच्यात दिलजमाई

Ravsaheb-and-Arjun
Ravsaheb-and-Arjun

औरंगाबाद - दानवे-खोतकर यांच्यातील राजकीय वादावर आजअखेर पडदा पडला. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधातील बंड मागे घेतले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. १७) झालेल्या बैठकीत खोतकरांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला व मेळाव्यात याबाबत घोषणा केली. जालना लोकसभा मतदारसंघात दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा करत गेले वर्षभर अर्जुन खोतकर यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. अखेर औरंगाबादमधील महायुतीच्या मराठवाडा महामेळाव्यात या वादावर पडदा पडला. मेळाव्यापूर्वी पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुखांसोबत दोन्ही नेत्यांची चर्चा झाली नि खोतकरांच्या माघारीवर शिक्कामोर्तब झाले.

भांडाल, तर तिसऱ्याचाच फायदा
खोतकर-दानवे वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट करत उद्धव ठाकरे म्हणाले, की आपण एकमेकांशी भांडत बसलो, तर तिसऱ्याचा फायदा होईल. त्यामुळे रावसाहेब अर्जुनाने धनुष्यबाण खाली ठेवलेला नाही, मी फक्त त्यांना माशाचा डोळा दाखवला. जुन्या गोष्टींचा कोळसा उगाळून आता काही होणार नाही; त्या कोळशाने आपलेच तोंड काळे करायचे का, असा सवाल करत सगळे विसरून पुढे जायचे, याचा विचार आता तुम्हाला करावा लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com