Loksabha 2019 : 'राष्ट्रवादी'चे विधिमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर "मातोश्री'वर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

बीड - नाराजीमुळे पक्षापासून दुरावलेले आणि भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विजयाचे आवाहन करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर शनिवारी (ता. 6) रात्री "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटले. त्यामुळे बीड जिल्ह्यात नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्‍यता आहे.

बीड - नाराजीमुळे पक्षापासून दुरावलेले आणि भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विजयाचे आवाहन करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर शनिवारी (ता. 6) रात्री "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटले. त्यामुळे बीड जिल्ह्यात नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्‍यता आहे.

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेचे एकमेव आमदार क्षीरसागर पक्षापासून दूर होते. जयदत्त व बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी समर्थकांचा मेळावा घेऊन पक्षावर नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करून डॉ. प्रीतम मुंडेंना विजयी करण्याचे आवाहन समर्थकांना केले. दुसऱ्याच दिवशी शनिवारी आमदार क्षीरसागर यांच्यासह बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मुंबईत "मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, सचिव मिलिंद नार्वेकर, नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागरही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये आगामी राजकीय वाटचालीबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे.

म्हणून दोन तलवारींसाठी दोन म्यान
मुंडे- क्षीरसागर घराण्यातील राजकीय सलोखा पंकजा मुंडे व जयदत्त क्षीरसागर यांच्यात कायम आहे. विधानसभा निवडणुकीपासून पंकजांचे वजन जयदत्त क्षीरसागर यांच्या पारड्यात आहे. "राष्ट्रवादी'त खच्चीकरण सुरू झाल्यानंतर त्यांनी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क वाढविला. तौलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपर्कात असतात. भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार का, अशी चर्चा होती; मात्र त्यांनी "मातोश्री'ची वाट निवडली आहे; कारण पंकजा मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर हे दोघेही ओबीसी नेते आहेत.

शिवाय, जयदत्त क्षीरसागर यांचा राजकीय अनुभव पंकजा मुंडेंपेक्षा अधिक असल्याने नेतृत्वाचा मुद्दाही होता, त्यामुळे एका म्यानात दोन तलावारींऐवजी दोन स्वतंत्र म्यान केल्याने आगामी राजकीय वाटचाली दोघांच्या सोयीच्या होणार आहेत. युतीमध्ये बीड मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याचाच आहे.

Web Title: Loksabha Election 2019 NCP Jaydatta Kshirsagar Matoshri Politics