Loksabha 2019 : दानवेंच्या पराभवाचा निर्धार कायम - बच्चू कडू

Bacchu-Kadu
Bacchu-Kadu

जालना - राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी महिनाभर आम्हाला गाफील ठेवून मनोमिलन केले. त्यामुळे मतदारसंघातील सर्व ठिकाणी जाता आले नाही; मात्र रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याचा निर्धार कायम असून, वेळप्रसंगी सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी जालन्यात सांगितले. 

कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. तत्पूर्वी गुरुवारी (ता. २८) बैठक घेऊन योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वक्तव्यावरून मी दानवे यांच्याविरोधात लढण्याचा निर्धार केला.

माझ्या विजयापेक्षा त्यांचा पराभव महत्त्वाचा आहे. राजकारण  मतांच्या संख्येने होत असते. त्यामुळे मी उभा राहूनही दानवे निवडून आल्यास वेगळा संदेश जाईल असेही कडू यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com